नगर ब्रेकिंग..बायकोला आणायला गेलेल्या जावयाला मारहाण प्रकरणात ‘ मोठी घडामोड ‘

शेअर करा

बायकोला आणण्यासाठी म्हणून तिच्या माहेरी गेलेल्या जावयाला बायकोसह सासरच्या लोकांनी मारहाण केली, त्यामुळे झालेला अपमान जावयाला सहन झाला नाही आणि त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील गंगापूर येथे उघडकीस आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी 22 तारखेला सदर व्यक्तीची पत्नी व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

अनिल बाळासाहेब धाकतोडे ( वय 23 वर्षे राहणार गंगापूर तालुका राहुरी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल धाकतोडे याची पत्नी प्रगती काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरी राहता तालुक्यातील लोणी येथे गेली होती. त्यावेळी तिला आणण्यासाठी अनिल तिथे गेला असताना त्याची व सासरच्या लोकांची भांडणे झाली व त्याची पत्नी व इतर नातेवाईक यांनी मिळून त्याला मारहाण केली

हताश झालेला अनिल त्याच्या घरी परत आला मात्र झालेला अपमान त्याला सहन झाला नाही आणि 17 ऑक्टोबर रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र त्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे .

शुक्रवारी मयत अनिल याची आई सुनिता बाळासाहेब धाकतोडे यांनी राहुरी पोलिसात याबद्दल फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून अनिलची पत्नी प्रगती, सुगंधा नंदू तुपे, तेजस झिंजुर्डे, राजेंद्र ठोकळ, मंगल राजेंद्र ठोकळ या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर कोर्टासमोर हजर केले असताना कोर्टाने त्यांना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागचंद सूर्यवंशी हे करत आहेत


शेअर करा