नागपूर हादरले..’ दृश्यम ‘ स्टाईलने अल्पवयीन मुलीच्या आंघोळीचा व्हिडीओ शूट केला अन त्यानंतर..

शेअर करा

महाराष्ट्रात रोज अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नागपूर इथे उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी अनैतिक संबंध ठेवत तिच्या कुटुंबीयांना देखील ब्लॅकमेल करण्यात आले. पीडित मुलीच्या भावाला याची माहिती मिळताच त्याने आरोपी तरुणाचा कायमचा काटा काढला.पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली असून अय्याज सिद्दीकी असे मृत तरुणाचे नाव आहे .

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी अय्याज सिद्दीकी याने पीडित मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ चोरून शूट केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत तो अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होता. वारंवार ब्लॅकमेल करुन आरोपी अय्याज याने पीडित मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवले. पीडित मुलगी ही गप्प गप्प राहत असल्याने घरच्यांना शंका आणि अखेर त्यांनी मुलीला बोलते करण्यात यश मिळवले मात्र यानंतर आरोपीने घरच्यांना देखील ब्लॅकमेल करायला सुरु केले.

या संपूर्ण प्रकाराची माहिती पीडित मुलीच्या भावाला मिळाली आणि त्याने आपल्या मित्राच्या मदतीने आरोपी अय्याज सिद्दीकी याचा काटा काढण्याचं ठरवलं. अय्याज सिद्दीकी याला गाठून त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली आणि अय्याज सिद्दीकी याचा मृतदेह एका कपड्यात बांधून झुडपात फेकला. 24 ऑक्टोबर 2021 रोजी पोलिसांना झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला होता तसेच त्याचा फोन देखील फोडून टाकण्यात आला.


शेअर करा