महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा- शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे

शेअर करा

पाथर्डी प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने एसटी परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे व एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व सुविधा देऊन एसटी कर्मचाऱ्यांबाबत तातडीचे निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी अहमदनगर राष्ट्रीय शेतकरी युनियनचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.

सध्या संपुर्ण महाराष्ट्रभर एस.टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या चालु आहेत. एस.टी. कर्मचारी टोकाची भुमिका का घेत आहेत, याचे महाराष्ट्र शासनाने आत्मपरीक्षण करावे. एस.टी. कर्मचारी तुंटपुंज्या पगारावर काम करत असतांना घर चालवणे व मुलांचे शिक्षण करणे त्यांना जीकरीचे झाले आहे. खरे पाहता एस.टी. कर्मचारी यांना आपल्या घरापासुन दुर राहुन मोठया जोखमीची नोकरी अत्यंत कमी पगारात करावी लागत असल्यामुळे त्यांना परीवहन महामंडळाच्या नोकरी मध्ये कोणतेही मोठे भविष्य दिसत नाही.

त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना या ताणतणाव व नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एस.टी. परीवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे व महाराष्ट्र शासनाच्या सर्व सुविधा एस.टी. कर्मचाऱ्यांना देऊन महाराष्ट्र शासनाने एस.टी. कर्मचाऱ्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन एस.टी.कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अहमदनगर राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष शेतकरीनेते बाळासाहेब ढाकणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकात करून राष्ट्रीय शेतकरी युनीयनचा एस.टी. कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला.

राष्ट्रीय शेतकरी युनीयन एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. महाराष्ट्र शासनाने तातडीने निर्णय घेऊन एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्यपुर्वक विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा,असे आवाहन महाराष्ट्र शासनाला शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी करून अहमदनगर राष्ट्रीय शेतकरी युनीयनचा एस.टी. कर्मचाऱ्यांना पाठींबा दर्शविला आहे.


शेअर करा