आमदार संग्राम जगताप यांची मनपा आयुक्तांकडे ‘ ही ‘ मागणी

शेअर करा

कोरोनामुळे उत्पादन व रोजगार कमी झाल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम झालेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरीक आर्थिक संकटात सापडले आहेत त्या अनुषंगाने करदात्याला कर भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देऊन 75 टक्के शास्तीत सूट द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे

संग्राम जगताप म्हणाले की, ‘ शहरातील करदात्यांनी मला भेटून माझ्याकडे मागणी केली आहे की, महापालिका मालमत्ता कर आकारते तो भरण्यास नागरिक तयार आहेत मात्र काही आर्थिक अडचणींमुळे अनेक करदाते महापालिकेने दिलेल्या मुदतीत कर भरू शकलेले नाही. त्यांना मालमत्ता करामध्ये शास्तीकर देखील लागलेला आहे. जर ह्या शास्तीत आपल्या अधिकारात 75 टक्के सूट देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली तर अनेक करदाते उत्स्फूर्तपणे थकबाकी भरण्यास देखील तयार होतील आणि महापालिकेची देखील आर्थिक स्थिती थोड्याफार प्रमाणात सुधारेल व त्यातून विकास कामांसाठी देखील निधी उपलब्ध करता येईल म्हणून करदात्यांना जास्ती मध्ये 75 टक्के सूट देण्यात यावी. ‘


शेअर करा