निळ्या रंगाच्या कपड्यात नवजात अर्भक, सीसीटीव्हीतील सत्य दिसताच पोलिसही हादरले

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना हिमाचल प्रदेशमध्ये उघडकीस आली आहे . काटेरी झुडुपात आढळलेल्या नवजात बालकाचे आई वडील हे चक्क नात्याने चुलत भाऊ बहीण असल्याचे आढळल्याने पोलिसही हादरून गेले आहेत. दुर्दैवाने या बाळाचा मृत्यू झालेला असून घटना उघडकीस आल्यावर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला असताना हे धक्कादायक सत्य समोर आले आहे .

हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यातील तलाई ठाणे क्षेत्रामधील घंडीर पंचायतीमधील गावामध्ये झाडीत एक नवजात अर्भक आढळून आले होते. नवजात अर्भकाचे आई आणि वडील दोघेही अल्पवयीन असून मुलगी दहावीमधील विद्यार्थिनी असून तिच्यावर तिच्या भावाने अत्याचार केला होता.सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची माहिती कुटुंबीयांना देखील समजली नाही.

२ ऑक्टोबर रोजी घंडीर गावामध्ये झाडीमध्ये एक नवजात अर्भक जिवंत सापडल्याने खळबळ उडाली होती. घंडीरमध्ये एका शेतातील झाडीमध्ये जिवंत अर्भक निळ्या कपड्यामध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडले होते. या बालकाचा काही वेळाने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत बालकाच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला होता.परिसरातील असंख्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी शोध घेतला.

पोलीस अधीक्षक एसआर राणा यांनी या प्रकरणाला दुजोरा देताना सांगितले की, गेल्या महिन्यात घंडीर पंचायतीमधील झाडीमध्ये एक नवजात अर्भक सापडले होते. या बालकाचा काही काळाने मृत्यू झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. दरम्यान, आज पोलिसांनी या अल्पवयीन मुलगा आणि मुलगीला चौकशीसाठी बोलावले होते. आता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. ही अल्पवयीन मुलगा आणि मुलगी नात्याने चुलत भाऊ-बहीण आहेत.