नगर ब्रेकिंग..आठवडी बाजारात ‘ त्या ‘ उद्देशाने घुसलेल्या चार महिला धरल्या

शेअर करा

कोरोनामुळे बंद असलेले आठवडी बाजार सुरू झाले मात्र त्यानंतर या बाजारांमध्ये चोरांचा सुळसुळाट सुरू झालेला आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथे आठवडे बाजारात भाजी खरेदी करणाऱ्या महिलांच्या बाजूला घोळका करून त्यांच्या पिशवीतील वस्तू आणि पर्स गायब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आठवडे बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याच्या उद्देशाने या महिला बाजारात दाखल झाल्या होत्या. तब्बल चार महिलांना अटक केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईचे परिसरात कौतुक व्यक्त केले जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार ललिता अमोल पवार ( राहणार अरणगाव तालुका जामखेड ), राधिका मनोहर काळे ( राहणार पाथरूड तालुका भूम ) चींगु समीर सय्यद ( राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा ), राणी किरण काळे ( राहणार पाथरूड तालुका भूम ) या चौघांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी 16 तारखेला राशीनच्या आठवडी बाजारात पोलीस गस्त घालत असताना चिंचेच्या झाडाखाली या महिला पर्स चोरताना आढळून आल्या होत्या. भाजी विक्रेते सुभाष सायकर, तुळशीराम सायकर, संजय राऊत आदिंच्या मदतीने महिला पोलिस कॉन्स्टेबल राणी पुरी यांनी त्यांना ताब्यात घेतले. यातील दोन महिलांवर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल असल्याचे समजते.


शेअर करा