पुणे हादरलं..ओयो हॉटेलमध्ये रूम बुक केली अन घडले ‘ सगळेच विपरीत ‘

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून विवाहास नकार देणाऱ्या प्रेयसीचा तिच्या प्रियकराने खून केला मात्र तिने आत्महत्या केल्याचा बनाव त्याने रचला मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रूम मधील परिस्थिती पाहूनच पोलिसांचा संशय बळावला त्यानंतर पोस्ट मार्टेम अहवालात तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्यांनतर तिचा प्रियकर हेमंत अशोक मोहिते (वय २९) याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ही घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडालेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सपना अशोक गवारे (वय २७) असं खून झालेल्या तरुणीचं नाव असून आरोपी हेमंत आणि तिचे एकमेकांवर प्रेम होते. पिंपरी-चिंचवडमध्ये २ दिवसांपूर्वी ओयो हॉटेल टाऊन येथे राहण्यास आले आणि रूम नंबर ३०१ दोघांनी बुक केली होती. हेमंत हा सपनाकडे विवाह करण्यास तगादा लावत होता मात्र सपनाने त्याला नकार दिला होता.

त्यांच्यात या कारणावरून भांडण झाले आणि रागाच्या भरात हेमंत याने सपनाचा गळा दाबून खून केला. घाबरलेल्या हेमंतने यानंतर मात्र प्रेयसीने आत्महत्या केली आहे असा बनाव रचला होता. मृत प्रेयसी सपना आणि हेमंत मूळ वाशी उस्मानाबाद जिल्ह्यातील असून पुणे इथे राहत होते. दरम्यानच्या काळातच त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले आणि त्याचा धक्कादायक असा शेवट झाला.

मयत तरुणीचे वडील अशोक नारायण गवारे यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली असून हेमंत अशोक मोहिते (वय २९) याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . पोलीस घटनास्थळी आले तेव्हा बाथरूमची एक खिडकी फुटलेली होती आणि रूम मधील परिस्थिती पाहूनच तिचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय आला आणि अखेर शवविच्छेदन अहवालात पोलिसांचा संशय खरा ठरला. हेमंतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार हे करत आहेत.


शेअर करा