महाराष्ट्र हादरला..विवाहित प्रेमी युगुलाने एका शेडमध्ये आतून कडी लावली मात्र त्यानंतर

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात कुपवाड येथे उघडकीस आली आहे. कुपवाड येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये विवाहित असलेल्या प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राजू महादेव माळी ( वय 36 सध्या राहणार खोत मळा कुपवाड मुळगाव बबलेश्वर जिल्हा विजापूर ) व रीना किरण पार्लेकर ( वय 30 राहणार वखारभाग मिरज ) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.

राजू याची पत्नी काही वर्षांपूर्वी चार वर्षांच्या मुलासह माहेरी निघून गेली आहे त्यामुळे माळी हे एकाकी आयुष्य जगत असताना कुपवाड एमआयडीसीतील एका गारमेंट कारखान्यात बस चालकाचे काम करत होते. त्याच कारखान्यात मिरज येथे राहणारी रीना पार्लेकर हीदेखील नोकरी करत होती याच दरम्यान त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

राजू माळी यांच्या घरी रीना सतत ये-जा करत असायची. नेहमी प्रमाणे काम संपल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी दोघेही खोत मळा मधील घरी आले आणि त्यानंतर ते दोघे देखील शेजारच्या नांद्रेकर मळ्यात गेले. रात्री शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून दोघे आत गेले आणि त्यानंतर दाराला आतून कडी लावून घेतली. खोलीत असलेल्या साडीने गळफास घेऊन दोघांनीही आत्महत्या केली. परिसरात या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


शेअर करा