पुणे हादरले..’ तुझ्या मुलाला पण मी सांभाळतो फक्त तू.. ‘, विवाहित महिलेचा असा निर्णय की ?

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील राहुरी येथे उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील एका विवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग आठ महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात बलात्कार व अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित अशोक पवार ( वय 24 राहणार वांजुळपोई तालुका राहुरी ) असे आरोपीचे नाव आहे गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, हवेली तालुक्यातील पीडीत विवाहित तरुणीची काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील आरोपी रोहित याच्यासोबत ओळख झाली होती. पीडित महिलेला एक मुलगा आहे मात्र रोहित याच्या संपर्कात आल्यानंतर आरोपीने तिला वारंवार तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवले तसेच तिच्या मुलाला सांभाळण्याचा देखील विश्वास त्याने दाखवला त्यामुळे पीडितेच्या त्याच्यावर विश्वास बसला आणि त्यातून ते एकमेकांशी बोलू लागले आणि एकांतात भेटू देखील लागले.

20 एप्रिल 2021 ते 25 डिसेंबर 2021 दरम्यान पीडितेच्या संमतीशिवाय तिच्यावर आरोपीने नगर तालुक्यातील निंबळक बायपास तसेच पुणे येथील हवेली तालुक्यात आणि गुजरात राज्यात अहमदाबाद येथे नेऊन वेळोवेळी बलात्कार केला, असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ‘ आपण मागासवर्गीय समाजातील आहोत याची देखील आरोपीला जाणीव होती तरीदेखील त्याने वेळोवेळी आपल्यावर बलात्कार करत शिवीगाळ आणि मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मी पोलीस ठाण्यात धाव घेतली ‘.

पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून रोहित अशोक पवार याच्या विरुद्ध बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे मात्र बलात्काराची घटना नगर तालुक्यात घडलेली असल्याने नगर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात वर्ग केला असून तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा