महाराष्ट्र हादरला..निसर्गोपचार केंद्रात महिलेला ‘ धक्कादायक ‘ अनुभव , पीडिता म्हणतेय की..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक घटना उघडकीस येत असताना ला एक घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली असून निसर्गोपचार केंद्रात उपचारासाठी आलेल्या महिलेला बेशुद्ध करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि त्यानंतर या व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत पीडित महिलेचे शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याला तीन जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गणेश मुरलीधर साठे ( वय 37 ) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे

उपलब्ध माहितीनुसार, गणेश साठे याने सदर महिलेचे अत्यंत विकृतपणे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला जेव्हा शुद्ध आली तेव्हा हा आरोपी डॉक्टर चक्क महिलेच्या अंगावर लघवी करत असल्याचे महिलेचे म्हणणे आहे . उपचार करत असताना त्याने तिला मूत्र देखील प्राशन करायला लावले, असे देखील आरोप महिलेने केले आहेत.

महिलेच्या म्हणण्यानुसार, महिलेला मासिक पाळी असताना देखील तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. गेल्या तीन वर्षांपासून महिला डॉक्टरच्या दहशतीत होती. डॉक्टरच्या सदर कृत्यांमध्ये डॉक्टरची पत्नीदेखील त्याला सहकार्य करत होती. तीन वर्षांपासून महिलेसोबत हा प्रकार सुरू होता मात्र त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडित महिला आपल्या विरोधात पोलिसांकडे जाण्याची आरोपीला कल्पना असल्याने त्याने पीडित महिलेला दबावात ठेवण्यासाठी पीडितेच्या विरोधात डॉक्टर आणि त्याच्या पत्नीने यापूर्वी तक्रारीदेखील दिलेल्या आहेत. पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत असून या गंभीर गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढे काय काय विकृत प्रकार या डॉक्टरने केले आहे ? याचा पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा