प्रेमाच्या मॅटरमध्ये तुरुंगातून सुटून बाहेर येताच घडले सगळेच ‘ अनपेक्षित ‘, महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना वर्धा इथे घडलेली असून मुलीच्या वडिलांनी आपल्या प्रेयसीला आपल्यापासून दूर नेल्याच्या विरहामुळे या तरुणाने आत्महत्या केली आहे. सौरभ अनिल मस्के (वय 21 वर्ष) असे या युवकाचे नाव असून याच मुलीच्या प्रेमाच्या प्रकरणात तो जेलमध्ये देखील जाऊन आला. त्यानंतरही तिला आणि झालेल्या गोष्टी विसरण्याचा तो प्रयत्न करत होता मात्र अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ अनिल मस्के (वय 21वर्ष वायगाव, वर्धा ) याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांनी देवळी पोलीस ठाण्यात सौरभ विरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना पकडून आईवडिलांच्या स्वाधीन केले होते मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी सौरभ मस्के याच्यावर कलम 363 भादवी तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले होते.

न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली होती मात्र काही दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका झाली आणि त्याने पोट भरण्यासाठी काहीतरी उद्योग म्हणून गावात एक पान टपरी घेऊन व्यवसाय सुरु केला होता मात्र गंभीर गुन्ह्यात पोलीस कोठडीत जाऊन आल्याने समाजाचा आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन वेगळाच झालेला आहे या चिंतेने त्याच्या मनात घर केले होते .

मुलीच्या मॅटरमध्ये आत जाऊन आल्याने आपली खूप बदनामी झालेली आहे. आपले कुटुंब देखील आपली काळजी करत नाही अशा अनेक प्रश्नांनी त्याला भेडसावले होते आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणता मार्ग त्याला दिसत नव्हता. मंगळवारी दिवसभर त्याने व्यवसाय केला मात्र त्याच्या मनात चिंता सतावत असल्याने त्याने सायंकाळी सात वाजताच्या सुमारास टॉवेलने गळफास लावून जगाचा निरोप घेतला.सौरभच्या जाण्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून देवळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे .


शेअर करा