वासनांध सासरा कुत्रीसोबत ‘ नको ते ‘ करत असताना सुनेवर नजर पडली अन ..

शेअर करा

देशात मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत असताना अशीच एक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली असून चक्क येथील एका ६० वर्षीय वृद्धाने चक्क निष्पाप कुत्रीवर बलात्कार केला आहे. गाझियाबादमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून आपल्या सासऱ्याचे हे नीच कृत्य समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनेला देखील या सासऱ्याने सोडले नाही आणि तिला अमानुष मारहाण केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी वृद्धाचे वय ६० वर्षे असून त्याने चक्क निष्पाप कुत्रीसोबत नको तो प्रकार केला . घराच्या नजीकच तो हा प्रकार करत असल्याने त्याच्या सुनेने त्याचे हे कृत्य मोबाईलमध्ये शूट करून त्याचा व्हिडीओ जगासमोर आणण्यासाठी कॅमेरा ऑन केला मात्र त्याने हे पाहिलं आणि सुनेकडे धाव घेत तिला मारहाण करून तिच्याकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि या वृद्धाने सुनेला अमानुष मारहाण केली. मामचंद असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

मारहाण केल्याने संतप्त झालेल्या सुनेने या नराधमाकडून कशीबशी सुटका करून घेत पीपल फॉर ऍनिमल या पशुप्रेमी आणि संरक्षक संस्थेशी संपर्क केला आणि आपल्या सासऱ्याच्या नीच प्रकाराचा पाढा या संस्थेच्या सदस्यांपुढे वाचला. पशुप्रेमी संस्थेच्या टीमने पुढील सूत्रं हाती घेत या घटनेची माहिती पोलिसांना दिली अन पोलिसांनी 60 वर्षीय आरोपीला अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, व्हिडीओवरुन केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आरोपी वृद्धावर भादंवि कलम 377 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धाने यापूर्वीही अशाप्रकारची कृत्ये परिसरातील प्राण्यांवर केल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.


शेअर करा