पुण्यातील ‘ ते ‘ प्रकरण दडपण्यासाठी वजनदार पुढाऱ्यांचे जोरदार प्रयत्न

शेअर करा

पुणे महापालिका हद्दीत काही महिन्यांपूर्वी तेवीस गावांचा समावेश करण्यात आला होता त्यानंतर त्यापैकी 17 ग्रामपंचायतीमधील तब्बल 658 बनावट कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आह मात्र हा चौकशी अहवाल फेटाळून लावावा आणि या कर्मचार्‍यांना सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी उपनगरातील नगरसेवक आणि वजनदार पुढाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्याच्या अगोदर ही गावे महापालिकेत जाणार आहेत याचा अंदाज बांधून ग्रामपंचायतील कर्मचाऱ्यांची बनावट भरती करण्यात आली होती त्यानंतर महापालिकेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना चौकशीचे देखील आदेश दिले होते. त्यानंतर चौकशी अहवालात हा बनावटगिरीचा प्रकार उघड झाला आणि आणि 14 ग्रामसेवक, दोन कृषी विस्तार अधिकारी अशा सोळा जणांना निलंबित करण्यात आले आणि ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे .

एकीकडे कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असल्याने दुसरीकडे मात्र महापालिका प्रशासनावर हा अहवाल फेटाळून लावण्याची मागणी केली जात आहे. उपनगरातील काही नगरसेवक आणि आणि काही वजनदार पुढारी यात जातीने लक्ष घालत असून जिल्हा परिषदेचा हा अहवाल फेटाळून लावावा आणि या कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, अशी मागणी करत आहेत. एकंदरीत हे सर्व प्रकरण दडपण्याची जोरदार तयारी काही नगरसेवक आणि पुढारी करत असल्याचे समजते.


शेअर करा