आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात चाललंय काय ? पस्तीसपेक्षा जास्त टोळ्या कार्यरत

शेअर करा

एकेकाळी दुष्काळी तालुका अशी कर्जतची ओळख होती मात्र त्यानंतर कुकडी घोड आणि सिना या योजनांमुळे कर्जत तालुक्यातील काही क्षेत्र ओलिताखाली आले. ओलिताखालील क्षेत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना देखील शेताच्या बांधावर असलेल्या वृक्षांची अडचण वाटू लागली आणि शेतातील पिकांना झाडाचा वसवा होतो, असे कारण पुढे करत अनेक झाडे तोडून टाकण्यात आली आणि अद्याप देखील हा प्रकार सुरू असून यात शेताच्या बांधावर लावलेली आंबा चिंच यासारख्या उपयुक्त झाडांच्या देखील कत्तली जोरदार पद्धतीने शेतकऱ्यांच्या मर्जीनेच सुरु आहेत.

शेतकऱ्यालाच आपल्या शेतातील झाडे नकोशी झाली तर दुसरीकडे वृक्षतोड करणाऱ्या तस्करांना यात एक मोठे अर्थार्जन आढळून आले आणि अनेक जणांनी वृक्षतोड करण्याचा व्यवसाय सुरू केला. कर्जत तालुक्‍यात तब्बल 35 ते 40 टोळ्या कार्यरत असून अत्याधुनिक साहित्याच्या माध्यमातून ही वृक्षतोड केली जाते त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि वाहतुकीची देखील मोठी यंत्रणा या तस्करांकडून कार्यरत आहे.

अवघ्या दोन ते तीन तासात झाडाला आडवे करून त्याची पद्धतशीरपणे विल्हेवाट देखील लावली जाते. सरकारी नियमाप्रमाणे कुठेही झाड तोडायचे झाले तर वनखात्याकडून त्याची परवानगी घ्यावी लागते मग ते झाड कुठतेही असो मात्र या नियमाला तिलांजली देण्यात येत आहे . आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील पिढ्यानपिढ्या आपल्या वाडवडिलांनी पाणी घालून जपलेली झाडे टिकून राहावीत आणि त्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


शेअर करा