मिसिंग मिस्ट्री..बीडमधून तब्बल सहा महिन्यापासून वडील रहस्यमयरित्या गायब

शेअर करा

महाराष्ट्रात पुणे येथे अवघ्या काही दिवसांपूर्वी चार वर्षीय बालक रहस्यमयरित्या गायब झाला होता . तपासाअंती त्याचे अपहरण केल्याची बाब स्पष्ट झाली अन सुदैवाने ह्या बालकाला त्याच्या आई-वडिलांनापर्यंत पोहोचवण्यात पोलिसांना यश आले. अशाच स्वरूपाची आणखी एक घटना बीड येथे घडलेली असून येथील राहणारे रत्नाकर अंबादास बोरे ( वय 64 वर्ष बीड ) हे रहस्यमयरित्या तब्बल सहा महिन्यापासून परिसरातून गायब झालेले आहेत. त्यांचे पुत्र प्रसाद बोरे ( वय 34 वर्षे ) यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिलेली आहे .

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे , माझे वडील रत्नाकर अंबादास बोरे ( वय 64 वर्ष राहणार पांगरी रोड बीड ) हे दिनांक २८/०७/२०२१ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता घरातून देवदर्शनासाठी गेले ते पुन्हा परतलेच नाहीत. त्यांची उंची पाच फूट चार इंच असून रंग सावळा आहे तर अंगात पांढऱ्या रंगाचे रेघाळे पूर्ण बाह्यांचे शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट असा पेहराव केलेला आहे.

२८ जुलै २०२१ रोजी ते घरातून कॅनॉल रोड पिंपरगव्हाण येथे मंदिर दर्शनासाठी जातो म्हणून घराबाहेर पडले होते मात्र पुन्हा ते घरी परतलेच नाहीत म्हणून कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना या नंबरवर ( प्रमोद बोरे- 8014136136 प्रसाद बोरे- 9975767808 ) संपर्क करण्याचे आवाहन केले आहे तसेच त्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान देखील पोलिसांपुढे आहे .

प्रसाद बोरे दिलेल्या माहितीनुसार वडील ज्यावेळी घरातून निघून गेले त्यावेळी कुठल्याही पद्धतीचा कौटुंबिक वाद झालेला नव्हता. नेहमी जातात अशा पद्धतीने ते देवदर्शनासाठी गेले ते पुन्हा आलेच नाहीत तरी सदर व्यक्ती कुठे आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे तसेच खात्रीशीर माहिती दिल्यास योग्य ते बक्षीस देखील दिले जाईल असे देखील म्हटले आहे.

पोलीस देखील सदर प्रकरणी तपास घेत असून अद्याप देखील ते मिळून न आल्याने नागरिकांनी खात्रीशीर माहिती हाती आल्यास पोलिसांपर्यंत अथवा कुटुंबियांना ( प्रमोद बोरे- 8014136136 प्रसाद बोरे- 9975767808 ) संपर्क करण्याचे आवाहन केले आहे .


शेअर करा