अनैतिक संबंधातून खून करणारी ‘ सिंधू ‘ तेव्हा बत्तीस वर्षांची होती, बेड्या ठोकल्या तेव्हा ..

शेअर करा

गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कधी ना कधी पोलिसांच्या तावडीत सापडतो अशीच एक घटना नगर जिल्ह्यात उघडकीला आली असून अनैतिक संबंधातून खून करून फरार झालेल्या महिला आरोपीला तब्बल 30 वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून एका महिलेचा खून केल्याचा तिच्यावर आरोप होता आणि न्यायालयाने तिला शिक्षाही सुनावली होती मात्र सात वर्षांपासून ही महिला फरार होती. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून तिला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. सिंधू कलावती कचरे ( वय 62 ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दादासाहेब सहादु रोकडे ( राहणार वय 62 राहणार राहुरी बुद्रुक ) यांनी तिच्याविरोधात फिर्याद दिली होती. तोफखाना पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

उपलब्ध माहितीनुसार, 22 मे 1992 रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी यांची मुलगी असलेली कल्पना हिचा विवाह वसंत अर्जुन पवार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीचे त्यांच्या संस्थेत काम करत असलेल्या सिंधू कचरे हिच्यासोबत अनैतिक संबंधाची माहिती असल्याचे कल्पना हीला समजले आणि तिने ही माहिती वडिलांना दिली.

आपल्या अनैतिक संबंधाची माहिती तू वडिलांना का दिली ? असेच सांगत पती वसंत आणि सिंधू कचरे या दोघांनी फिर्यादी यांच्या मुलीला बेदम मारहाण केली आणि पेटवून दिले. दुर्दैवाने त्यात तिचा मृत्यू झाला आणि वसंत आणि सिंधू कचरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंड इतकी शिक्षा सुनावली त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात जाऊन देखील आरोपींना काही उपयोग झाला नाही आणि आरोपी वसंत पवार याने शिक्षा भोगली.

सिंधू कचरे ही मात्र सन 2014 पासून फरार झाली होती. पोलीस तिचा शोध घेत होते मात्र ती वेळोवेळी आपली जागा बदलत असल्याने तिला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते अशातच गुप्त सूत्रांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गोंदे दुमाला तिथे ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश इंगळे, बबन मखरे, फकीर शेख, विशाल दळवी यांच्या पथकाने कारवाई करत तिला बेड्या ठोकल्या.


शेअर करा