नाशिक हादरले..भोंदूबाबाने आईसह तिच्या मुलींनाही नाही सोडले , ‘ अशी ‘ झाली सुरुवात ?

शेअर करा

काही लोक भोंदूबाबाच्या इतके आहारी जातात कि आपला विवेक गमावून बसतात.अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली असून एका भोंदूबाबाने भावाच्या मदतीने एका महिलेसह तिच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. येवला शहरात घडली असून या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मुलीचं लग्न जमत नसल्याने तालुक्यातील एका गावातील बाबाकडे गेली असताना तुमच्या मुलीला जादूटोणा झाल्याचा सांगत सलग दोन वर्षांहून अधिक काळ भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केला. बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असं सांगितलं तसेच त्यावर उपाय करण्यासाठी भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींना पिण्यास पाणी दिले आणि चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार केला. बलात्कार करताना त्याने या प्रकाराचा व्हिडीओ देखील बनवला असेही फिर्यादी यांचे म्हणणे आहे.

बलात्कार करताना बनवलेल्या व्हिडिओचा आधार घेत तो सातत्याने त्यांना ब्लॅकमेल करत होता. सुफी अजीज अब्दुल बाबा आणि जब्बार शेख असे या भोंदू बाबांचे नाव असून त्यांनी तब्बल दोन वर्षे 4 महिने वेळोवेळी आई आणि तिच्या तिन्ही मुलींवर बलात्कार करून ब्लॅकमेल करत पैशाची मागणी देखील केली. तसेच एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त केल्याची देखील बाब समोर आली आहे. येवला शहर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


शेअर करा