सीएनजीमध्ये तब्बल इतकी वाढ तर पेट्रोल डिझेलचे संभाव्य दर इतके ?

शेअर करा

पाच राज्यात निवडणूक संपल्यानंतर तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करावी अशी शिफारस सरकारकडे केली असून पेट्रोल दरात तब्बल 12 ते 17 रुपयांची वाढ करण्यात यावी, अशी शिफारस इंडियन ऑइल कंपनीने केंद्रीय मंत्रालयाला केली आहे

रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याचे कारण देऊन तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात 130 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. याआधी 2014 च्या सुमारास कच्च्या तेलाचे दर हे प्रती बॅरल 140 रुपयांपर्यंत पोहोचले होते मात्र त्यावेळी ते देखील पेट्रोलचे दर 74 रुपयांपर्यंत ठेवून काँग्रेस सरकारला यश आले होते आता भाजप सत्तेत असल्याने पेट्रोल दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार काय करते ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

एकीकडे पेट्रोल डिझेल दरवाढीची शिफारस सुरू असतानाच दुसरीकडे मात्र सीएनजीच्या किंमतीत देखील तब्बल 20 टक्के वाढ करून सीएनजी प्रतिकिलो 120 रुपयांवर पोहोचले आहे. नागपुरात सीएनजी सर्वाधिक महाग असून त्याची किंमत पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही जास्त झाल्याची झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षभरापासून नागपूरमध्ये सीएनजीचे दर एकशे एक रुपये प्रति किलो होते त्यात भर होऊन आता ते 120 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.


शेअर करा