चार मुलांची आई अन बॅंडवाला भाडेकरू , पतीच्या मृतदेहासमोरच ‘ नको ते ‘ केलं..

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना झारखंडमधील जमशेदपूर येथे समोर आलेली आहे. प्रेमामध्ये अडसर ठरणारा पती आणि आणि सासऱ्याचा एका महिलेने प्रियकराच्या मदतीने काटा काढला आहे. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये ही घटना घडली असून सदर महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रियकर जितेन हा बँडमध्ये वाद्य वाजवण्याचे काम करत होता.

उपलब्ध माहितीनुसार, महिलेच्या पतीने तिला आणि तिच्या प्रियकराला एकदा आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते त्यानंतर पतीने तिला विरोध केला असता पत्नी दीपा ( वय 32 ) तिचा प्रियकर जितेन ( वय 30 ) यांनी दोघांनी मिळून पती राजू मोहंती ( वय 38 ) यांचा गळा दाबून खून केला. खून करते वेळी आरडाओरडा झाल्याने महिलेचा सासरा सुशील मोहंती ( वय 65 ) यांना जाग आली हे लक्षात आल्यानंतर दीपा आणि जितेन यांनी दोघांनी मिळून त्यांचाही खून केला. आरोपी महिला ही चार मुलींची आई असून हे प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पती आणि सासऱ्याचा खून केल्यानंतर दीपा हिने दोन्ही मृतदेह एका खोलीत ठेवले आणि त्यानंतर ती प्रियकरासोबत दुसऱ्या खोलीत बराच वेळ होती याच दरम्यान दोघांनी शरीर संबंध देखील ठेवल्याची माहिती पुढे आलेली आहे. जितेन दीपाच्या घरी भाड्याने राहत होता त्यावेळी त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यातूनच पुढे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून सर्व शक्यतांचा विचार करत तपासाला सुरुवात केली आहे.


शेअर करा