पतीच्या मोबाईलवर पत्नीचा ‘ दहा महिन्याचा डाटा ‘, पीडिता म्हणतेय की ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून महिलेचे अश्लील फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी देत एका आरोपीने तब्बल दहा महिने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला असून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गंगाखेड तालुक्यातील आरोपी गजानन गणेश गादेकर हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र असून त्याने आळंदी येथील जलाराम गोशाळेत मी काम करत असून तुम्ही तिथे मजुरीसाठी या असे तिच्या पतीला सांगितले होते. त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये पीडिता आणि तिचा पती हे आळंदी येथे कामाला गेले. त्यावेळी या आरोपीचे महिलेच्या घरी जाणे-येणे होते.

एकदा तिचा पती कामाला बाहेर गेलेला असताना त्या रात्री आरोपी गजानन गादेकर हा घरी आला आणि त्याने जेवणामध्ये गुंगीचे औषध देऊन पीडितेचे अश्लील फोटो काढले। हे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल अशी धमकी देऊन एप्रिल 2021 ते 22 जानेवारी 2022 पर्यंत त्याने वेळोवेळी मनमानी पद्धतीने अत्याचार केले. कहर म्हणजे त्याने 27 फेब्रुवारी रोजी सदर फोटो पीडितेच्या पतीला मोबाईलवर देखील पाठवले.

आपल्या सोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार पीडितेला सहन झाला नाही आणि तिने तिच्या आईला ही घटना सांगितली. त्यानंतर पीडित महिलेने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गजानन गणेश गादेकर सध्या राहणार आळंदी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटना आळंदी हद्दीत घडलेली असल्याने हा गुन्हा आळंदी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.


शेअर करा