तीन वर्षांच्या ‘ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ चा भयावह शेवट, असा होता मास्टरप्लॅन ?

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना गुजरात इथे समोर आलेली असून चक्क देवपूजा करत असताना एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे . मयत महिला ही एका व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि तिच्यासोबत राहणाऱ्या प्रियकरानेच तिच्यासोबत हे भयावह कृत्य केले आहे .

संबंधित महिलेची एक वर्षाची मुलगी तिथेच परिसरात खेळत असताना आरोपीने हे भयावह कृत्य केले आणि तिचा मृतदेह तसाच टाकून तो ऑफिसला निघून गेला. कामावरून परत आल्यावर कुणीतरी हे केलंय असा बनाव त्याने रचला होता मात्र अखेर त्याचे बिंग फुटले आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या .

उपलब्ध माहितीनुसार, सदर घटना ही गुजरातच्या सुरतमधील गौतमनगर सोसायटीत घडली असून स्नेहलता असे महिलेचे नाव असून ती तिचा प्रियकर प्रकाश याच्यासोबत रहात होती. गेल्या तीन वर्षांपासून ते सोबत राहत होते. आरोपीनं हत्येची कबुली दिली असून मुलीच्या नावावर संपत्ती करावी यासाठी स्नेहलता त्रास द्यायची म्हणून आपण ही हत्या केली असे त्याचे म्हणणे आहे .

मंगळवारी स्नेहलता आपल्या राहत्या घरात देवपूजा करत होत्या आणि त्यांची एक वर्षांची चिमुकली घराच्या आसपास खेळत होती त्यावेळी संधी साधून प्रकाश याने आरोपी प्रकाश याने संधी साधून अचानक स्नेहलता यांच्यावर वार केला आणि त्यांचा गळा चिरून जीव घेतला. मृतदेह तसाच टाकून तो कामानिमित्त बाहेर निघून गेला. संध्याकाळी घरी आल्यावर आपण हा प्रकार अचानक पाहिला असा कांगावा करत त्याने पोलिसांनाही बोलावून घेतले मात्र पोलिसांच्या प्रश्नांनंतर तो गडबडू लागला .

आपण सायंकाळी कामावरून घरी आलो, तेव्हा स्नेहलता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, असा कांगावा सुरुवातीला प्रकाशने केला मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. संशय आल्यानं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर प्रकाशनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.


शेअर करा