चला ठरलं तर..करुणा शर्मा इथून लढवणार निवडणूक

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून करुणा शर्मा महाराष्ट्रातील राजकारणात चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. आपला शिवशक्ती पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला असून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात त्या पोटनिवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त असून 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असून करुणा शर्मा यांनीच हा पक्ष स्थापन केलेला आहे. गेले काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असेल यावर बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर आपण स्वतःच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे देखील त्या म्हणाल्या. पक्ष स्थापनेनंतर थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरल्यानं करुणा शर्मा यांची आणि त्यांच्या पक्षाची कोल्हापुरात जोरदार चर्चा आहे .

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून सत्यजित (नाना) कदम यांचे नाव जवळपास निश्चित असून गेल्या दहा वर्षापासून नाना कदम हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार झाले होते. मात्र आमदारकी मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच त्यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित असून तशा पद्धतीने तयारी देखील सुरु आहे.


शेअर करा