नगर मनपा अभियंता कल्याण बल्लाळ यांचे निधन

शेअर करा

नगर महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता असलेले कल्याण बल्लाळ ( वय 54 ) यांचे सोमवारी 21 तारखेला सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे शोकाकुल वातावरण आहे. बल्लाळ यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा,मुलगी आणि जावई असा परिवार आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारींची देखील बल्लाळ हे तात्काळ दखल घेत असल्याने नगरकरांना ते हक्काचे अधिकारी वाटत असायचे.

नगररचना विभागात उपअभियंता म्हणून बल्लाळ हे कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी महापालिकेतून स्वेच्छानिवृत्ती मिळावी म्हणून देखील अर्ज दाखल केला होता. अनेक वर्ष नगररचना विभागात काम केल्यामुळे नगर शहरातील विकास कामांची त्यांना चांगली माहिती होती त्यामुळे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून देखील त्यांचे मार्गदर्शन देखील घेतले जात होते. कल्याण बल्लाळ यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर त्यांच्या आप्तेष्टांसोबतच महापालिका कर्मचाऱ्यांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


शेअर करा