नगर ब्रेकिंग..’ मला तुझ्याशी बोलायचंय ‘ म्हणत गाडी आडवी लावली , न्यायालयाने दिली शिक्षा

शेअर करा

नगर येथे एका अल्पवयीन मुलीची चक्क रस्त्यात मोटरसायकल आडवी लावून छेड काढण्याचा प्रकार घडल्या प्रकरणी आरोपीला जिल्हा विशेष न्यायाधीश माधुरी मोरे यांनी एक महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट मनीषा शिंदे यांनी काम पाहिले.

अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी अक्षय अशोक भिंगारदिवे ( वय 22 राहणार शिवाजी नगर केडगाव ) याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटना ही जून 2018 मध्ये नगर शहर परिसरात घडलेली होती.

अल्पवयीन मुलगी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास क्लासमधून घरी जात असताना आरोपी आणि त्याच्या मित्राने तिला मोटरसायकल आडवी घातली आणि मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत तिचा रस्ता आडवला मुलीने त्याला विरोध केला असता आरोपी आणि त्याचा मित्र मोटारसायकलवरून निघून गेले.

पीडित मुलगी ही घाबरत घाबरत घरी आली आणि तिने आपल्या सोबत झालेला हा प्रकार भावाला सांगितला. पीडित मुलीचा भाऊ आणि त्याचा मित्र आरोपीचा शोध घेत असताना तो त्यांना केडगाव येथील भूषण नगर परिसरात दिसून आला त्यानंतर भावाने त्याला जबाब विचारला असता त्याने रस्त्यावरील दगड तिच्या भावाला मारला आणि तो पळून गेला.

त्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांसह कोतवाली पोलिस ठाण्यात पीडितेने दाखल होत आरोपीच्या विरोधात तक्रार दिली होती. आरोपीवर कायद्यानुसार पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यावर सुनावणी होऊन आरोपीला एक महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.


शेअर करा