अखिलेश यादव यांनी घेतला ‘ मोठा निर्णय ‘ , आता भाजप निशाण्यावर

शेअर करा

पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यावर पंजाब वगळता इतरत्र भाजपला मोठे यश मिळाले तर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तरी सत्ता मिळवता आलेली नाही त्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी राष्ट्रीय राजकारणातून आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला असून त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे येत्या काळात समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसणार आहे.

उत्तर प्रदेश येथील निवडणुकीत अखिलेश यादव सत्ता मिळवण्यात यशस्वी झाले नाही मात्र भाजप समोर भक्कम असा विरोधी पक्ष त्यांनी निर्माण केला आहे. राज्यात यापुढे सातत्याने सक्रिय राहत काम केल्यास समाजवादी पक्षाला चांगले यश मिळण्याची शक्यता असून त्या दिशेने अखिलेश यादव यांनी रणनीती तयार केलेली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत सध्या समाजवादी पक्षाचे 111 राष्ट्रीय लोकदलाचे 8 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे सहा सदस्य आहेत त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत असून देखील मोठ्या प्रमाणावर विरोधीपक्ष आक्रमक झालेले येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. अखिलेश यादव यांच्यासोबत असलेले राष्ट्रीय लोकदल आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी यांना आपल्या गोटात ओढण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपल्यासोबत ठेवण्यासोबतच विरोधी पक्षाचा आक्रमकपणा ठेवण्याचे मोठे आव्हान अखिलेश यादव यांच्यासमोर आहे .


शेअर करा