‘ तेव्हापासून रोज तुम्ही माझ्या स्वप्नात आणि..’, कापड दुकानदाराचा असा कारनामा की..

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आले असून गेवराई इथे दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेला चहा पाजला आणि त्यानंतर बिलावर लिहण्याचा बहाणा करून महिलेचा मोबाईल नंबर मागितला आणि गोड बोलून त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला अशी घटना 25 मार्च रोजी उघडकीला आली आहे. गेवराई शहरातील एका कापड दुकानदारावर बलात्कार ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शंकर दिलीप मोरे ( वय 32 राहणार राजपिंपरी हल्ली मुक्काम गेवराई ) असे आरोपीचे नाव असून त्याचे गेवराई येथे कपड्याचे दुकान आहे. शहरातील 29 वर्षीय महिला खरेदीसाठी त्यांच्या दुकानात गेली होती त्यावेळी त्याने कपडे दाखवण्याच्या बहाण्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिला चहा पाजला. कपड्यांचे बिल करण्यासाठी त्याने महिलेचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यानंतर तिला वारंवार फोन करत तुम्हाला महत्त्वाचे बोलायचे आहे तुम्हाला भेटायचे आहे असे देखील सांगितले.

शासकीय आयटीआय परिसरात महिलेला त्याने बोलावले आणि ‘ तुम्ही जेव्हापासून माझ्या दुकानात येऊन गेला तेव्हापासून रोज तुम्ही माझ्या स्वप्नात येतात ‘ असे सांगून या महिलेवर अत्याचार देखील केले असे तिचे म्हणणे आहे. पुढे आरोपीने नवीन बसस्थानक येथे बोलावून घेत ‘ तुझ्याशी लग्न करतो आणि तुझ्यासकट तुझ्या मुलांना देखील सांभाळतो ‘ असे म्हटले आणि मादळमोही येथे एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

पीडित महिलेने आरोपी यास लग्नासंदर्भात विचारल्यानंतर आरोपी मोरे याने तिला जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असे पीडितेचे म्हणणे आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने हा प्रकार घरी सांगितला आणि त्यानंतर प्रकरण पोलिसात गेले. प्रकरण पोलिसात गेल्याचे समजतात आरोपी फरार झाला असून पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड अधिक तपास करत असल्याचे समजते.


शेअर करा