शरद पवार यांच्या घरावर हल्ला, विखे पाटील म्हणतात की ?

शेअर करा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे यांनी बोलताना, ‘ एसटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने उद्रेक झाला आणि तो उद्रेक रस्त्यावर आला. कोणत्याही नेत्याच्या घरावर जाऊन आंदोलन करण्याचा हा मार्ग नाही मात्र झालेल्या गोंधळाला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे’, असे म्हटलेले आहे.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, ‘ एसटी कामगार पाच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. 125 कामगारांचे बळी गेले तरीही सरकार शांत बसून होते केवळ त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचे कारण पुढे करून सरकार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना विश्वासात घेऊन संवाद सुरू ठेवायला हवा होता.

प्रत्येक मंत्री फक्त कायदेशीर कारवाई करण्याचा धाक दाखवून दडपशाही करत असल्याने हा रोष प्रकट झाला आणि राज्यसरकारमुळे ही वेळ आली. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात होती मात्र चर्चा करायची नव्हती म्हणून या कामगारांच्या तोंडाला पाने पुसली असे देखील आमदार पुढे म्हणाले .


शेअर करा