केडगावमध्ये तीन कोटीची सुपारी ? मास्टरमाइंडचा शोध घ्या

शेअर करा

नगर शहर येथे नगरसेवक अमोल येवले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात देणाऱ्या तसेच त्यांच्या खुनासाठी तीन कोटींची सुपारी कोणी दिली. त्याचा मास्टरमाइंड कोण आहे ? याचा शोध घ्यावा त्याचबरोबर नगरसेवक अमोल येवले यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, राजेंद्र दळवी, अभिषेक कळमकर नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले आदी जणांनी येवले यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असून हे कोण घडवत आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे .


शेअर करा