धक्कादायक..पारनेरमध्ये चक्क पोलिसांना शिवीगाळ अन मारहाण

शेअर करा

गावाकडील तमाशाचे ग्रामीण भागात मोठे आकर्षण असते मात्र याच दरम्यान उत्साहाच्या नादात अनेक गावकरी कायदा हातात घेत असल्याचे देखील प्रकार उघडकीला येत आहेत. अशीच एक घटना पारनेर तालुक्यातील गुणोरे इथे समोर आलेली असून तमाशात गोंधळ घालणाऱ्या 21 जणांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.. दुर्दैवी बाब म्हणजे गोंधळ रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील टोळक्‍याने मारहाण केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील यात्रेनिमित्त लोकनाट्याचा कार्यक्रम सुरू असताना पोलिस हेडकॉन्स्टेबल मयुर गोकुळ तोरडमल हे बंदोबस्तासाठी होते. लोकनाट्य सुरू असताना आकाश अशोक पठारे, खंडू सुभाष हिंगे हे उठून नाचायला लागले त्यामुळे पाठीमागे असलेल्या प्रेक्षकांना कार्यक्रम नीट दिसत नव्हता. त्या वेळी पोलिस बंदोबस्तवर असलेले हेडकॉन्स्टेबल डहाळे, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल तोरडमल यांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले त्यानंतर शिवीगाळ सुरू झाली आणि चक्क पोलिसांना देखील शिव्या देण्यात आल्या.

आकाश अशोक पठारे याने चक्क तोरडमल यांच्या डोक्यात मारले आणि इतर पंधरा ते वीस जण पोलिसांवर धावून आले, असे तोरडमल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक उगले हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमाव पांगवला.

पोलीस हेडकॉन्स्टेबल मयूर तोरडमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश गोपीनाथ गोपाळे, संकेत राजू गोपाळे, संकेत भाऊ खोसे, खंडू सुभाष शिंदे यांच्यासह एकवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पूर्वीप्रमाणे यात्रा आता पहिल्यासारखा सुरू झालेल्या आहेत आणि सोशल डिस्टंसिंगचे देखील कुठले नियम राहिलेले नाही त्यामुळे उत्साहाच्या भरात नागरिक कायदा हातात घेत असल्याचे प्रकार दुर्दैवाने होत आहेत. आधीच कोरोना काळात बंदोबस्तात थकलेल्या पोलिसांना त्यानंतरही कुठलाच आराम मिळाला नसल्याचे दिसून येत आहे अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत मारहाणीचे प्रकार होत असतील तर ती अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.


शेअर करा