‘ होय पैसे घेतले पण तुम्हीच सांगा एवढे ..’ , गुणरत्न सदावर्ते कोर्टात काय म्हणाले ?

शेअर करा

शरद पवार यांच्या सिल्वर या निवासस्थानी हल्ला प्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गिरगाव न्यायालयात आपली बाजू मांडताना एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली असून एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 300 ते 500 रुपये घेतले मात्र ते फक्त कोर्टाच्या कामकाजासाठी घेतले असे त्यांनी सांगितले आहे सोबतच एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते देखील सांगा ? असेही ते पुढे म्हणाले. नोटा मोजण्याचे मशीन देखिल पण तीन हजार रुपयात खरेदी केली आहे असेही ते पुढे म्हणाले.

गिरगाव न्यायालयाच्या आदेशानंतर सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी सदावर्ते यांनी एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतले आणि त्या पैशातून मालमत्ता गाडी खरेदी केली असे सांगत सरकारकडून त्यांना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती याच दरम्यान सदावर्ते यांच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे रजिस्टर आणि नोटा मोजण्याचे मशीन सापडल्याचा देखील सरकारी वकिलांकडून उल्लेख करण्यात आला

गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने कोर्टात कुठलाच वकील नसल्याने त्यांनी स्वतः आपली बाजू मांडली त्यावेळी ते म्हणाले की, ‘ पोलिसांनी जी कागदपत्रे जप्त केली ते केवळ वकील पत्र आहे . माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला हे दुर्दैवी आहे. माझे सासू-सासरे स्वातंत्र्यसैनिक आहेत. गाडी घेतली तिची नोंद आरटीओमध्ये आहे. गाडी घेण्यासाठी जे पैसे देण्यात आले ते ऑनलाईन दिलेले आहेत आणि ही गाडी मी 2014 पूर्वी खरेदी केलेली आहे’, असे देखील ते पुढे म्हणाले

कोर्टातून बाहेर पडताना सरकारी वकील आणि पत्रकारांकडे पहात त्यांनी ‘ मी कष्टकऱ्यांचा वकील आहे हर्षद मेहता नाही आणि मी हर्षद मेहता होऊ देखील शकत नाही ‘ असे म्हणाले त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आलेला आहे .


शेअर करा