दुसऱ्याच्याच वडिलांना ‘ बाबा ‘ म्हणत त्याने टाहो फोडला, प्लॅन समजल्यावर पोलिसही हैराण

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून सातारा जिल्ह्यातील रुग्णालयात स्ट्रेचरवर एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह पाहून मुलाने बाबा असे म्हणून जोरदार हंबरडा फोडला आणि तो रडू लागला. उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी देखील भाउक झाले आणि त्यानंतर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी मुलाकडे देण्यात आला. मुलाने देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले मात्र त्यानंतर जे घडले ते पोलिसांना देखील चकवा देणारे होते.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीत एका पुरुष जातीचा बेवारस मृतदेह पोलिसांना आढळून आला होता त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी हा फोटो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केला आणि त्यावेळी दादा विलास सुरवसे ( वय 37 राहणार मोडनिंब तालुका माढा ) हा रुग्णालयात गेला आणि त्याने एकच हंबरडा फोडला.

त्याचा आक्रोश पाहून पोलीस देखील काही काळ भाऊक झाले त्यानंतर त्याने स्वतःला सावरत हा मृतदेह ताब्यात घेतला आणि विडणी येथे राहत असलेल्या जागी अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दादा सुरवसे याने मृतदेह गावाकडे नेण्याऐवजी विडणी येथे का केला अशी शंका उपस्थित झाली आणि पोलिसांनी सदर प्रकरणी लक्ष घातले.

तिसऱ्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे हे आपल्या पथकासह दादा सुरवसे याच्या मोडनिंब येथे घरी पोहोचले त्यावेळी दादाचे वडील विलास मुरलीधर सुरवसे ( वय 62 ) यांचे एक वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे असे घरच्यांनी सांगितले त्यानंतर सुरवसे याच्या घरातून पोलीस निघून गेले आणि आणि अवघ्या काही तासातच दादा सुरवसे याला ताब्यात घेतले.

पोलिस तपासात जे समोर आले त्यानुसार विलास सुरवसे यांच्या नावाचा एका बँकेचा तब्बल 40 लाखांचा विमा दादा यांनी उतरवलेला होता मात्र वडिलांचे अचानक निधन झाल्याने त्याला ती रक्कम घेता आली नाही म्हणून अपघाती निधनसाठी कोणी बेवारस मृतदेह मिळतो का ? याच्या तो शोधात होता त्यानंतर पैशासाठी त्याने स्वतःच्या वडीलांना विसरून दुसऱ्याच्या वडिलांनाच बाप मानलं आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, सेल्फ अटेस्टेड करून मृतदेह हा आपल्याच वडिलांचा आहे असा आभास निर्माण केला मात्र त्याची ‘ ओव्हर ऍक्टिंग ‘ नडली आणि आणि त्याचा भांडाफोड झाला.


शेअर करा