प्रियंका दिवाण यांची आत्महत्या नव्हे तर तो ‘ कट रचून खून ‘, पोस्ट मार्टेममध्ये धक्कादायक खुलासे

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना काही दिवसांपूर्वी अमरावती इथे उघडकीला आली होती. डॉ. प्रियंका दिवाण ( वय 27 ) या महिलेने आत्महत्या केल्याचे वृत्त सर्व समाज माध्यमांमध्ये आले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या महिलेचा खून झाल्याचे समोर आले असून सदर प्रकरणी संशयित असलेल्या तिचा पती डॉक्टर पंकज दिवाण याला शुक्रवारी अटक करण्यात आलेली आहे तर आणखी एका महिलेला देखील ताब्यात घेण्यात आले अशी माहिती आहे. गाडगेनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिलेली आहे. प्रियंका दिवाण यांचा मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी गेला तेव्हापासून तीनही संशयीत आरोपी नॉटरिचेबल झाले होते मात्र त्यानंतर पंकज दिवाण याला अटक करण्यात आली तर त्याची बहीण अद्यापही फरार आहे.

शवविच्छेदन अहवालात पंकज याची पत्नी असलेली प्रियंका हिचा मृत्यू मारहाण आणि डोक्यात अंतर्गत जखमा झाल्याने झाला असल्याचे समोर आलेले असून मयत प्रियंका यांच्या बहिणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी प्रियंकाचा खून अत्यंत शांत डोक्याने कट रचून करण्यात आलेला आहे असे म्हटलेले आहे मात्र त्यानंतर आत्महत्येचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र हा खून असल्याचे समोर आले आहे.

प्रियंकाचा पती डॉक्टर पंकज दिवाण, त्याची आई आणि बहिणीच्या विरोधात 27 एप्रिलला गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले होते. 20 एप्रिल रोजी प्रियंका ही तिचा पती पंकज दिवाण याच्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावर मयत अवस्थेत आढळून आली होती. तिचे शवविच्छेदन स्थानिक ठिकाणी केले तर अहवालावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणून अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले आणि त्याचा रिपोर्ट समोर आला.

बुधवारी संध्याकाळी हा रिपोर्ट आल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आणि पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी अवघ्या 30 तासात दोन आरोपींना ठोकलेल्या आहेत. प्रियंका दिवाण ही पंकज दिवाण यांची दुसरी पत्नी असून त्यांच्या कौटुंबिक कलहामुळे हा प्रकार झाल्याचा प्राथमिक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


शेअर करा