प्राध्यापकाच्या चाळ्यांनी महाराष्ट्र हादरला ,मुलांनाही द्यायचा ‘अशी ‘ ऑफर की ?

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नागपूर येथे उघडकीला आली असून मुलींना पास करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून शारीरिक संबंधाची डिमांड करणाऱ्या प्राध्यापकावर पाचपावली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राकेश गेडाम असे या प्राध्यापकाचे नाव असून सिंधू महाविद्यालयात तो कार्यरत आहे. महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागात १९ वर्षीय एक विद्यार्थीनी शिकत असून मागील वर्षी तिचे कुठे ऍडमिशन होत नसल्याने ऑक्टोबर 21 मध्ये ती गेडाम याला भेटली त्यावेळी त्याने तिचे ॲडमिशन करून देण्यास तिला मदत केली आणि त्यानंतर देखील त्याने तिला मदत केली.

विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, ‘ मदतीच्या बहाण्याने तो प्रत्येक वेळी तिला बॅड टच करायचा आणि ‘ तू बहुत क्यूट है..प्रोफाईल मे अलग दिखती है ऐसे अलग दिखती है ‘ असेदेखील म्हणायचा सोबतच ‘ पास करने के लिए तो क्या कर सकती है ? ‘ असेदेखील त्याने तिला एकदा विचारले होते. मुलीला अडीचशे रुपये ऍडमिशनसाठी कमी पडत असल्याने त्याने तिला स्वतःचे कार्ड देऊन एटीएम मध्ये पाठवले होते त्यावेळी त्याने तिला नको त्या ठिकाणी हात लावला असे देखील मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

प्राध्यापकाचे असे चाळे वाढतच गेल्याने आणि त्याचा बोभाटा होऊ लागल्याने विद्यार्थिनीने मित्रमैत्रिणींना ही बाब सांगितली त्यावेळी त्यांनी देखील समोर येऊन इतर विद्यार्थिनीसोबत देखील त्यांनी अशाच पद्धतीने शारीरिक लगट केली आणि त्यांच्याकडे देखील शारीरिक संबंधाची मागणी केल्याचे समोर आले. कुणाला पास करण्याचे आमिष दाखवत तर कोणाला फेल करण्याची धमकी देत तो आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर काही मित्र-मैत्रिणीसोबत पाचपावली पोलिसात तक्रार देण्यात आली आणि या प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी गेडाम याचा वाढदिवस असल्याने प्रथम वर्षाचे विद्यार्थी विद्यार्थिनी नंदनवन भागातील एका दुसऱ्या कॉलेजमध्ये गेले होते त्यावेळी एका विद्यार्थ्याला बर्थडे गिफ्टच्या बदल्यात ‘ 1 नाईट के लिये किसी को राजी कर ले ‘ असे देखील म्हटले होते असाही आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. गेडाम यांच्या एका सहकाऱ्याला त्याची ही विकृती ठाऊक होती मात्र त्याने महाविद्यालयीन प्रशासनाला याबद्दल का सांगितले नाही असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे.


शेअर करा