उघड्या डोळ्यांनी महिलेचा विनयभंग, इनकम टॅक्सच्या तीन निरीक्षकांना बेड्या

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना गोवा येथे उघडकीला आली असून सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी प्राप्तीकर खात्याच्या तीन निरीक्षकांना अटक केलेली आहे. महिलेने म्हटल्याप्रमाणे तीन महिन्यापासून तिला आरोपी त्रास देत होते. मनिंदर आशरी ( दिल्ली ) , आदित्य वर्मा ( राजस्थान ) आणि दीपक कुमार ( बंगळुरू ) अशी अटक केलेल्यांची नावे असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही त्याच कार्यालयात कामाला असून संशयित व्यक्ती यांच्या हाताखाली ती काम करत असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार तिघांपैकी दोन संशयित मनिंदर आणि दीपक हे दोन महिन्यांपासून तिचा लैंगिक छळ करत होते तसेच मोबाईलवर तिला अश्लील संदेश देखील पाठवत होते. हा प्रकार असह्य झाल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

तक्रारीमध्ये तिने मनिंदर आणि दीपक यांच्यावर ठपका ठेवत तिसरा संशयित असलेला आदित्य हा तिला सतत डोळ्यांनी खुणावत तिचा विनयभंग करत होता असे म्हटले आहे त्यामुळे त्याच्यावर देखील गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे असे पणजी पोलिसांनी सांगितले आहे. पणजी पोलिसांनी प्राप्तीकर खात्यात जाऊन या घटनेचा पंचनामा केला आणि इतरही काही जणांच्या जबानी नोंदवल्या आहेत तर संशयित वावरत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.


शेअर करा