जीवावरच बेतलं असत, ‘ तो ‘ प्रियकर आणि रिक्षाचालक अखेर अटकेत

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीचा पाठलाग केला त्यानंतर तिला जबरदस्तीने रिक्षात बोलावून बसून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला त्यामुळे भीतीने या प्रेयसीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि रिक्षाचालक या दोघांनाही अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आकाश इंगळे ( वय 22 )असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी तरुणी मुलुंड येथील एन एस मार्ग येथे लेक्चरसाठी गेली होती. त्यावेळी आकाश हा एक रिक्षा घेऊन तिला भेटण्यासाठी गेला आणि तिला वाटेतच थांबून तिच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला तिने नकार देताच त्याने तिला बळजबरीने रिक्षात बसवले आणि तिचा विनयभंग केला.

सदर प्रकारामुळे पीडित तरुणी घाबरुन गेली आणि तिने रिक्षाच्या बाहेर उडी घेतली त्यानंतर तिथून पळ काढत तिने पोलीस ठाणे गाठले. आकाश इंगळे याच्या विरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांतीलाल कोथमिरे यांनी दिली आहे.


शेअर करा