पुण्यात खळबळ..पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगायचा अन् त्यावेळी स्वतः मात्र..

शेअर करा

एक खळबळजनक घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात उघडकीस आली असून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला त्याच्या दोन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. धक्कादायक बाब म्हणजे सर्व प्रकार सुरू असताना महिलेचा पती कोपऱ्यात उभं राहून हे पाहत होता.

सदर प्रकारानंतर महिलेने (48 वर्षे) पती आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तर या घटनेबद्दल परिसरात आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी पती पत्नीला मानसिक त्रास देत होता. तिची इच्छा नसतानाही त्याने 2020 मध्ये हडपसर येथील एका लॉजवर मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर जुलै 2021 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका फ्लॅटवर दुसऱ्या एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हे सर्व होत असताना पती मात्र कोपऱ्यात उभं राहून पाहत होता.

पत्नीने अनेकदा याबद्दल संताप व्यक्त केला मात्र पतीत सुधारणा होत नसल्याने शेवटी संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. पतीच्या अशा कृत्यामुळे अनेकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला असून पुण्यात खळबळ उडाली आहे


शेअर करा