पुण्याहून नाशिकला एसी बसवण्यासाठी ‘ तो ‘ आला खरा मात्र झालं असं की ?

शेअर करा

एसी बसवण्यासाठी नाशिक येथे आलेल्या पुण्यातील एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी 20 तारखेला उघडकीला आला असून नाशिक पुणे मार्गावरील पौर्णिमा स्टॉप इथे ही घटना उघडकीला आलेली आहे. प्राथमिक अंदाजावरून लुटमारी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचा अंदाज असून तीन संशयीत व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हरीश भास्कर पाटील ( वय 44 सुयश सहकारी संस्था वारजे जकात नाका पुणे ) असे या व्यावसायिकाचे नाव असून त्यांचा एसी बसवण्याचा व्यवसाय आहे. नाशिक येथे आई-वडील वास्तव्यास असल्याने त्यांचे नाशिकला कायम जाणे येणे होते. पुण्यासहित नाशिक येथे देखील त्यांनी आपल्या व्यवसायाचा जन्म बसवला होता. नाशिक शहरातील काही संस्था आणि कार्यालये येथे देखील आपली सेवा देत होते.

नाशिक येथे एसी बसवण्यासाठी ते १९ तारखेला रात्री पुण्यावरून आले होते त्यावेळी द्वारका चौकात उतरल्यानंतर पौर्णिमा स्टॉपच्या दिशेने जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या ट्रिपल सीट तरुणांनी त्यांची वाट अडवली आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यात त्यांचा मृत्यू झाला.

सकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या एका नागरिकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ भद्रकाली पोलिसांना यासंदर्भात खबर दिली आणि अवघ्या काही मिनिटाच्या आत घटनास्थळी पोलिस पोहोचले. त्यांच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांची ओळख पटली असून लुटमारीच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे . भद्रकाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.


शेअर करा