औरंगाबाद हादरले..तिच्यावर वार करून म्हणाला ‘ मै भी उसके पास जा रहा हू ‘

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद येथे उघडकीला आलेली असून एका विकृत नराधमाने एका मुलीला ऑफिसच्या समोरून नेले आणि त्यानंतर तिची हत्या केली. बराच वेळ यांच्यात झटापट सुरू होती मात्र त्यांच्या या भांडणात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी चक्क बघ्याची भूमिका घेतल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत मुलीचे नाव कशिश उर्फ सुखप्रीत कौर ( वय १८ ) असे तरुणीचे नाव असून तरुणाचे नाव शरणसिंग सेठी ( वय २० ) असे आहे. शरणसिंग नावाच्या नराधमाने तिच्या पोटावर डाव्या बाजूने चार तर उजव्या बाजूने नऊ वार केले. जखम खोलवर असल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि काही वेळातच तिने प्राण सोडले त्यानंतर तिचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला.

शरणसिंग गॅरेजमधील काम करणारा मेकॅनिक असून काही दिवसांपूर्वी त्याने हे काम सोडले होते. त्याचे वडील रिक्षाचालक असून त्याची मैत्रीण कशिश ही सुखवस्तू कुटुंबातील आहे. घटना घडल्यानंतर शरणसिंग फरार झालेला असून त्याच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

त्याचा मोबाईल देखील बंद येत असून त्याने कशिश मृत्युमुखी पडल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या तिच्या मैत्रिणीला ‘ मै भी उसके पास जा रहा हू ‘ असे म्हटल्याने तो आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकतो असेही अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करत असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहे.


शेअर करा