पुणे हादरलं..मैत्रिणीचा पती म्हणून झालेल्या ओळखीला ‘ वेगळंच ‘ वळण, आता प्रकरण पोलिसात

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर म्हणून देशात ओळख असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीला आली असून मैत्रिणीचा पती म्हणून परिचित असलेल्या एका व्यक्तीने बायकोच्या मैत्रिणीसोबत ओळख वाढवली आणि इन्स्टाग्रामवरून तू मला खूप आवडतेस असे म्हणून तिला फिरायला घेऊन गेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केलेला आहे. सदर घटनेनंतर त्याने त्याचा व्हिडिओ बनवला आणि ब्लॅकमेल करत तिच्याकडून वारंवार पैसे घातले. सतत त्याचा त्रास होत असल्याने तरुणीने मैत्रिणीच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहरातील खराडी परिसरात ही घटना उघडकीला आली असून सदर प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी तरुणीचे वय 23 वर्ष असून आरोपींची नावे सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे ( वय 22 ) आणि त्याचा मित्र असलेला आशिष विजय कांबळे ( वय 23) अशी आहेत . खराडी येथील एका बिजिनेस सेंटरमध्ये तसेच वाघोली आणि इतर परिसरात वेळोवेळी या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले असे त्यांचे म्हणणे आहे. सुमारे एक वर्ष तिच्यासोबत हा प्रकार सुरू होता.

आरोपींपैकी सिद्धार्थ हा याच्या बायको सोबत पीडित महिलेची मैत्री आहे त्यातूनच तिची आणि आणि आरोपीस विद्यार्थ्यांची ओळख झाली होती त्यानंतर त्याने इंस्टाग्राम अकाउंट वरून तिच्याशी वेळोवेळी संपर्क केले आणि तिचा फोन नंबर त्यानंतर त्याने मला आवडतेस असे म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी तिला फिरायला घेऊन गेला आणि जबरदस्त यादरम्यान जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला यादरम्यान त्यांनी सदर प्रकाराची व्हिडिओ देखील काढले आणि ते दाखवण्याची ची सोशल मीडियावर तयार करण्याची धमकी देत वेळोवेळी तिचे शोषण

पीडित महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आत्तापर्यंत त्याने तिच्याकडून 17 हजारांपेक्षा जास्त रक्कम घेतलेली असून त्याचा मित्र असलेला आशीष कांबळे याने देखील या महिलेला धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केलेला आहे. सातत्याने या दोन व्यक्तींकडून होत असलेला त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने चंदननगर पोलिसात धाव घेऊन दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


शेअर करा