..अन ‘ ते ‘ टोळके निघाले मध्य प्रदेशातील, कामरगाव शिवारात घडली होती घटना

शेअर करा

नगर पुणे रोडवर कामरगाव शिवारानजीक अल्पोपहारासाठी थांबलेल्या एका खासगी आराम बसमधून एका सरकारी अधिकारी असलेल्या महिलेची पर्स चोरीला गेली होती आणि सुमारे दोन लाखांचा ऐवज त्यात लुटण्यात आला होता. सदर प्रकरणी सुरुवातीला सुपा पोलिस ठाण्यात आणि त्यानंतर हा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या टोळीतील एक जणाला बेड्या ठोकलेल्या असून त्याचे इतर साथीदार मात्र फरार झालेले आहेत. मध्य प्रदेश येथील हे टोळके असून त्यांनी हा प्रकार केला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सरकारी अधिकारी असलेल्या रोशन हरिभाऊ जवंजाळ ( राहणार हडपसर पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीत सुमारे दोन लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज एका खाजगी आरामबसमधून लुटण्यात आलेला होता. कामरगाव शिवारात असलेल्या एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली होती सदर गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीत मारग यांनी तपास सुरू केला.

गुप्त सूत्रांच्या माध्यमातून सदर गुन्ह्यातील आरोपी हे कामरगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्यानुसार त्यांनी या हॉटेलच्या बाजूला सापळा रचला आणि असलम खान अली हुसेन ( वय 44 राहणार मध्य प्रदेश ) याला बेड्या ठोकल्या. संशयित आरोपी हेच असल्याची पोलिसांची खात्री होती. यावेळी केलेल्या कारवाईदरम्यान असलम खान याला पकडण्यात यश आले मात्र त्याचे दोन साथीदार कारमधून पळून गेले.

सदर टोळी ही सरावलेली असून आरामबस मधील प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या बॅगमधून दागिने आणि रोख रक्कम असा चोरणे हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे. चोरी करण्यासाठी चारचाकी गाडीचा वापर हे करायचे आणि तिची नंबर प्लेट प्रत्येक वेळी बदलायचे असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा