पुण्यात खळबळ..चक्क पीडित मुलगीच ‘ फितूर ‘ झाल्यावर न्यायालय म्हणाले ?

शेअर करा

पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून चुलतीकडे सोडण्यासाठी जात असताना अल्पवयीन असलेल्या मामे बहिणीवर तिच्या आते भावाने अत्याचार केला आणि या प्रकरणात पीडित मुलगी ही गरोदर राहिली. सदर प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पीडित मुलगी फितूर झाली मात्र वैद्यकीय पुराव्याच्या आधारे तिच्यावर याच भावाने अत्याचार केल्याचे समोर आले आणि न्यायालयाने त्याला वीस वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, ‘ दंडाची रक्कम पीडित तरुणीला देण्यात यावी तसेच दंड न भरल्यास एक वर्षांचा अतिरिक्त कारावास आरोपीला देण्यात यावा. 2015 साली प्रकरणातील आरोपी हा त्याची चुलती असलेल्या महिलेकडे पीडित मुलीला घेऊन जात असताना त्याने हंडेवाडी रोड परिसरात या मुलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला तिच्या घरी सोडून निघून गेला.

अत्याचार करून झाल्यावर चार महिन्यापर्यंत मुलीला मासिक पाळी न आल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आल्यावर आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली त्यानंतर या आरोपीच्या विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी डॉक्टर, रासायनिक विश्लेषण, पोलीस उपनिरीक्षक आदी व्यक्तींची साक्ष महत्त्वाची ठरवत आरोपीला शिक्षा ठोठावली आहे.


शेअर करा