आगीचे कारण अस्पष्टच मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या ‘ त्या ‘ प्रकाराची चौकशी होणार

शेअर करा

नगर येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 14 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता आणि संदर्भातला अहवाल आता राज्य सरकारला प्राप्त झालेला असून त्यामध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहेत तर अद्यापपर्यंत देखील आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले नाही मात्र जिल्हा नियोजनाने जिल्हा रुग्णालयाला जो निधी दिलेला होता त्याच्यामध्ये देखील अनेक अनियमितता आढळून आल्याने सदर प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर येथे केलेले आहे मात्र यामुळे अनेक जणांचे धाबे दणाणले आहे.

नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की, ‘ नगर जिल्हा रुग्णालयाचा अहवाल विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला सादर केलेला असून या अहवालात अतिशय गंभीर बाबी पुढे आलेल्या आहेत मात्र नक्की कशामुळे आग लागली याचे कारण त्यामध्ये देण्यात आलेले नाही. सदर प्रकरणात जे कोणी निष्काळजी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे.

नगर जिल्हा रुग्णालयाच्या विविध कामांसाठी आम्ही ऐंशी कोटी रुपये त्यांना दिले होते मात्र या निधीच्या वापरामध्ये अनियमितता आढळून आलेली असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी लागणार आहे. सदर प्रकरणी कारवाई सुद्धा करण्याच्या सूचना आपण दिलेल्या असून सदर अहवाल हा आरोग्य विभागाला पाठविण्यात आलेला आहे असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा