तिच्या मृतदेहाचे ६ तुकडे आणि उद्यानाची दोन तिकिटे : ‘ असा ‘ काढला पोलिसांनी माग ?

शेअर करा

मुंबईची राहणारी असलेल्या तरुणीने एका उत्तर प्रदेशातील तरुणाशी विवाह केला. लॉकडाऊन झाल्यामुळे दोघे मुंबई सोडून मूळ गावी उत्तर प्रदेशात गेले मात्र तिकडेच पतीने तिचा खून केला आणि नेपाळला पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. अत्यंत जुजबी अशा माहितीवर पोलीस आरोपीपर्यंत पोहचल्याने ह्या खुनाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाला एसपीने 25 हजार रुपयांचे बक्षीस देखील दिले आहे.

काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका महिलेचा मृतदेह ट्रॉलीच्या पिशवीत आढळून आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला असता तो मृतदेह मुंबईतील आंबेडकर-टाटा-वाशाट रोड येथील भरतनगर येथील सम्राट शेखची मुलगी मालन बादशाह शेख उर्फ आयशा हिचा असल्याचे आढळून आले आणि पोलिसांनी तपास सुरु केला.

उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील भरतनगर येथील सम्राट शेखची मुलगी मालन बादशाह शेख उर्फ आयशा हीच विवाह उत्तर प्रदेशातील समीर नाव एका युवकाशी झाला होता. समीर बलरामपूरच्या महाराजगंज पोलिस स्टेशन परिसरातील गुलहरीचा रहिवासी आहे आणि मुंबईच्या वांद्रे भागात कोंबडीच्या दुकानात काम करायचा पण लॉकडाऊन दरम्यान समीर पत्नीसह मार्चमध्ये लखनौला परतला.

लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर त्याच्याकडे काही काम राहिलेले नव्हते त्यातून आर्थिक अडचणी वाढू लागल्या आणि त्यांच्यात वाद देखील होऊ लागले. असेच एकदा वाद विकोपाला गेले आणि रागाच्या भरात लखनौला इंदिरानगरमध्ये आयशाची समीरने हत्या केली आणि मृतदेहाचे सहा तुकडे केले. त्यानंतर बाजारातून चादर आणली आणि मृतदेह पॅक करण्यासाठी इतर साहित्य खरेदी केले. त्याच रात्री मृतदेहाचे सहा तुकडे ब्रीफकेस आणि बॅगमध्ये भरून हायवेला फेकले आणि फरार होण्यासाठी नेपाळचा रस्ता धरला.

इकडे पोलिसांचा तपास सुरु होताच पोलिसांना दोन महत्त्वपूर्ण संकेत सापडले. पहिली बॅगमध्ये आरोपीची जीन्स होती. ज्यात लखनौच्या उद्यानात जाण्यासाठी लागणारी दोन तिकिटं आणि बॅगेत ठेवलेले वीज बिल होते. हे बिल इतके जुने होते की त्यावरील केवळ काही आकडे दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी या दोन पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.


शेअर करा