कोरोनाची चौथी लाट ? मास्कबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की..

शेअर करा

राज्यातील वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या संदर्भात मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चौथ्याला लाटेला संसर्गाचा वेग जास्त असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही कारण रुग्ण बरा होण्याचा कालावधी हा कमी आहे, असे म्हटले आहे.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, ‘ मुंबई पुणे ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा वेग जास्त असल्याचे दिसत आहे त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढल्या कारणाने चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोमवारपासून या चाचण्या वाढवण्यात येणार आहेत मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही.

संसर्गाचे प्रमाण या जिल्ह्यात जास्त आहे त्या ठिकाणी 8 6 5 3 टक्के असा पॉझिटिव्हिटी रेट आहे म्हणजे शंभर तपासण्या मागे एवढे संसर्ग बाधीत आढळत आहेत . सर्वसाधारणपणे एकूण पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपैकी एक टक्के इतके प्रमाण आहे त्यामुळे घाबरून जाण्याची आणि फार काळजी करण्याचे कारण नाही. मास्क वापरण्याची सक्ती नसली तरी तो वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी केले असून मास्क नसल्यास दंड लावू नये मात्र तो वापरावा असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा