नगर शहरातील नुपूर शर्मा यांचे ‘ ते ‘ पोस्टर पोलिसांनी हटवले , काय आहे प्रकार ?

शेअर करा

नगर शहरात नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर तमाम मुस्लिम बांधवांनी बंद पुकारला होता त्यानंतर नगर शहरात दहा तारखेला दुपारी साडेतीनच्या सुमारास जमाव जमून रामचंद्र खुंट परिसरात नुपूर शर्मा यांचे चित्र आणि त्यावर बुटाच्या तळाचा शिक्का असलेले पोस्टर चिटकवून जनमानसात तेढ निर्माण करणाऱ्या दहा ते पंधरा जणांच्या जमावावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

रामचंद्र खुंट ते नालबंद खुंट या दरम्यान ही घटना घडलेली असून काही अज्ञात लोकांनी नुपूर शर्मा यांचे चित्र असलेले एक पोस्टर रस्त्यावर चिटकवले होते त्यावर बुटाचे शिक्के देखील त्यावर मारण्यात आलेले होते ही माहिती समजताच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन हे पोस्टर काढून टाकण्यात आले.

कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंधरा ते वीस अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.


शेअर करा