पैशासाठी पत्नीला ‘ त्याच्या ‘ जवळ सोडून पतीने केले पलायन , महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून स्वतःचे ऐशआराम भागवण्यासाठी एका विकृत पतीने चक्क पत्नीला परपुरुषाच्या स्वाधीन केले आणि तिच्यावर त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. अत्यंत लज्जास्पद असा हा प्रकार वाशिम जिल्ह्यातील वरोली इथे उघडकीला आलेला आहे. पतीच्या त्रासाला वैतागून 23 जून रोजी पत्नीने पोलिसात गुन्हा दाखल केला असून पतीचे वय 35 वर्षे असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पतीसोबत रोजगारासाठी मुंबईला गेली होती. 2022 मध्ये तिच्या पतीने एका अज्ञात व्यक्तीकडून काही पैसे उसने घेतले होते आणि त्यानंतर या पैशाची परतफेड म्हणून त्याने पत्नीला आणि तिच्या मुलीला त्याच्याकडे सोपवले होते त्यानंतर आपल्या वडिलांची तब्येत बरोबर नाही असे सांगून त्याने गावी पलायन केले.

पती गावी गेल्यानंतर महिला ज्याच्याकडे राहत होती त्या व्यक्तीने अनैतिक संबंध ठेवण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला त्यानंतर महिलेने पतीला संपर्क केला त्यावेळी त्याने , तो जे सांगतोय ते ऐक असे सांगितले अन जर ऐकले नाही तर मुला मुलीला मारून टाकण्याची देखील त्यांनी धमकी दिली. हतबल महिलेने अखेर पतीचे ऐकत परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर हा प्रकार नेहमीचाच झाला.

काही कालावधी गेल्यानंतर या व्यक्तीने तिच्यासोबत ठेवलेल्या शारीरिक संबंधाचे मोबाईलमध्ये चित्रण केले आणि त्यानंतर म्हणेल त्यावेळी तो तिला शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करू लागला. सदर घटना मुंबईतील खारघर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आलेला आहे तर आरोपीच्या विरोधात भादवि कलम 498 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.


शेअर करा