अधिकारी नोटा मोजून दमल्यावर मशीन आणून केली रकमेची मोजणी

शेअर करा

देशात लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार बिहार येथे उघडकीला आणला असून ड्रग्स इंस्पेक्टर असलेला अधिकारी जितेंद्र कुमार याच्याकडे तब्बल पाच पोती भरून नोटा आढळून आलेल्या आहेत. या नोटा मोजण्यासाठी अखेर अधिकारी दमल्यानंतर नोटा मोजण्याच्या मशीन बोलवण्यात आलेल्या आहेत.

लाचलुचपत विभागाकडून या प्रकरणी कारवाई करण्यात आली त्यावेळी जितेंद्रकुमार याच्या घरातील एक खोली उघडण्यात आली त्यामध्ये पाच पोते भरून ठेवलेले होते. या पोत्यात काय आहे हे पाहिले असता त्यामध्ये पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. या नोटा तब्बल दीड कोटी रुपयांच्या पुढे असू शकतील असा अंदाज लावण्यात आलेला आहे तर अर्धा किलो सोने आणि अडीच किलो चांदी देखील येथून जप्त करण्यात आलेली आहे.

जितेंद्र कुमार हा इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असून पाटणा येथे त्याचा एक बंगला आहे तर झारखंड येथे देखील मोठ्या प्रमाणावर त्यांनी मालमत्ता कमावलेली आहे. सदर अधिकारी हा पदाचा दुरुपयोग करत भ्रष्टाचार करत होता असा त्याच्यावर आरोप असून त्याच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर अचानकपणे केलेल्या कारवाई हे घबाड हाती लागले आहे .


शेअर करा