..म्हणे दुर्धर आजार डोक्यावर ठेवून होतोय बरा ? पादरी बाबावर कारवाईची अंनिसची मागणी

शेअर करा

समाजातून अंधश्रद्धा हद्दपार करण्यासाठी एका बाबावर कारवाई झाली की लगेच नवीन बाबा समाजात निर्माण होतो. अनेकदा काही तोटा नाही बाबा पैसे घेत नाही या आमिषाने नागरिक अशा व्यक्तींच्या जाळ्यात अडकतात आणि त्यानंतर गुरफटत जातात. असाच एक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात समोर आलेला असून सुमारे दोन वर्षांपासून लोकांना भूलथापा देत अनेक कॅन्सर, बीपी शुगर आपण फक्त डोक्यावर हात ठेवून बरे करतो असा दावा करणाऱ्या एका बाबाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी आरोग्यसभा भरवत त्याने अनेक जणांना गंडवले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बाबासाहेब शिंदे असे या पादरी बाबाचे नाव असून त्याच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य चिटणीस शहाजी भोसले यांनी केलेले आहे. पैठण तालुक्यात असलेल्या परडी गावात हा दोन वर्षांपासून आरोग्य सभा भरवत असून परिसरातील गोरगरीब नागरिकांना आपण केवळ डोक्यावर हात ठेवून कॅन्सर बीपी शुगर असे अनेक असाध्य रोग बरे करतो असा दावा तो करत असायचा.

नागरिकांनी सुरुवातीला केवळ डोक्यावर हात ठेवून आजार जर बरा होत आहे तर जायला काय हरकत आहे असे करत या बाबाच्या दरवाजात हजेरी लावायला सुरुवात केली. हळूहळू या बाबाची ख्याती संपूर्ण राज्यात पोहोचली आणि राज्यभरातून अनेक भाविक या बाबाकडे यायला लागले. त्याचा गैरफायदा घेत हळूहळू या बाबाने परिसरात चांगलाच जम बसवला मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नजर त्याच्यावर पडली तसेच एका इलेक्ट्रॉनिक चॅनेलने देखील प्रकरणाचा मोठा पाठपुरावा करत या बाबाचा पर्दाफाश केलेला आहे. फक्त भेटण्यात काही तोटा नाही या विचाराने अनेक नागरिक अशा बाबांच्या दारात जातात आणि त्यानंतर हळूहळू स्वतःचे मेंदू गहाण ठेवत पूर्णपणे या बाबांच्या आहारी जातात असेच आतापर्यंतच्या प्रकरणात समोर आले आहे.


शेअर करा