महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पुन्हा तारीख पे तारीख , सरन्यायाधीश निवृत्त झाल्यावरच सुनावणी

शेअर करा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात कोर्टात तारीख पे तारीख सुरू झालेले असून मंगळवारी होणार असलेली सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. आमदारांची अपात्रता, शिवसेना नक्की कुणाची, धनुष्यबाण नक्की कोणाच्या मालकीचा ? अशा अनेक प्रश्नांवर सध्या सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आलेला असून या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे मात्र ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

मागील तीन आठवड्यात चौथ्यांदा ही सुनावणी लांबणीवर पडलेली असून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या परस्परविरोधी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून सुरुवातीला 12 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार होती त्यानंतर पुन्हा 22 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. त्रिसदस्यीय सदस्यांपैकी एक सदस्य गैरहजर असल्याने मंगळवारी देखील सुनावणी झाली नाही.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असून आतापर्यंत झालेल्या सुनावणीत त्यांनी शिंदे गटाला फटकारल्याचे दिसून आलेले आहे आणि काही महत्त्वपूर्ण निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. अवघ्या काही दिवसांनंतर ते निवृत्त झाल्यानंतर आता या प्रकरणी सुनावणी होईल असे एकंदरीत चित्र आहे.


शेअर करा