पुणे हादरलं..विवाहितेला सर्वांसमोर धबधब्याखाली आंघोळ करायला लावले

शेअर करा

पुणे शहरात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून व्यवसायात चांगली भरभराट व्हावी तसेच पुत्रप्राप्तीसाठी एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका विवाहित महिलेला एका व्यवसायिकाने सर्वांसमोर धबधब्याखाली स्नान करायला लावण्याचा प्रकार पुणे शहरालगत आंबेगाव खुर्द येथे उघडकीला आणला . भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या व्यावसायिकासह विवाहितेची सासू-सासरे आणि मांत्रिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बाबा जमादार असे या मांत्रिकाचे नाव असून त्याच्यासह सासू-सासरे आणि पती यांच्याविरोधात विवाहित महिलेने भारती पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे 2013 मध्ये या विवाहीतेचा व्यावसायिकासोबत विवाह झालेला होता त्यानंतर त्याने तिचा कौटुंबिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. महिलेच्या आईवडिलांनी हिरेजडित सोन्याचे दागिने पतीकडे ठेवण्यास दिले होते त्याचा देखील त्याने परस्पर अपहार केला आणि तिच्या कागदपत्रांच्या आधारे सुमारे 75 लाख रुपयांचे कर्ज काढले.

कर्जाची परतफेड होत नसल्याने पती नैराश्यात गेला आणि अशात त्याला बाबा जमादार नावाचा मांत्रिक भेटला. व्यवसायात भरभराट आणि घरात सुख शांती तसेच पुत्रप्राप्ती होण्यासाठी त्याने या व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढले आणि काही विधी करायला सांगितले. त्यानुसार विवाहित महिलेला सर्वांसमोर एका ठिकाणी धबधब्याखाली अंघोळ करायला लावली आणि तिची सुमारे एक ते दोन कोटी रुपयांची फसवणूक केली असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे

भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून पती आणि सासू सासरे तसेच मांत्रिकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार फसवणूक नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर पुढील तपास करत आहे तर या मांत्रिकास कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथून बेड्या ठोकलेल्या आहेत.


शेअर करा